नागपूर : मुदत ठेव पूर्ण झाल्यानंतरही ग्राहकांचे पैसे परत न करता सुमारे ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सक्करदरा पोलिसांनी पूनम अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक व व्यवस्थापकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. वृत्त लिहेपर्यंत आरोपींची नावे कळू शकली नाहीत.
मार्च महिन्यात संचालक व व्यवस्थापकाने नागरिकांना मुदत ठेवीत पैसे गुंतविल्यास दाम दुपट्ट मिळण्याचे आमिष दाखविले. या आमिषाला ग्राहक बळी पडले. हर्षवर्धन झंझाळ यांनी एक लाख, श्याम तेलंग यांनी सात लाख, उज्ज्वला पाटील यांनी साडेतीन लाख, ज्ञानेश्वर केचे यांनी तीन लाख ३० हजार, शिवानी चांदेकर यांनी एक लाख पाच हजार, आशा सांगोळे यांनी एक लाख १८ हजार, अशोक बांते यांनी आठ लाख, संदीप केचे यांनी तीन लाख, अंबादास तायडे यांनी दोन लाख ९५ हजार, शीतल काटेकर यांनी १५ लाख २४ हजार, कुबेर मिश्रा यांनी चार लाख रुपये मुदत ठेव योजनेत गुंतविले.
मुदत संपल्यानंतरही संचालक व व्यवस्थापकाने पैसे परत केले नाही. हर्षवर्धन यांनी दिलेल्या तक्रारीवरून सक्करदरा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
अधिक वाचा : विजय के तबला वादन ने किया मंत्रमुग्ध