नागपूर : नागपूर मेट्रोच्या सीताबर्डी ते खापरी या मार्गाला सीएमआरएसचे (मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त) प्रमाणपत्र मिळाल्याने मेट्रोच्या फेऱ्या वाढविण्याचा मार्ग मोकळा झाला. शुक्रवार, २८ जूनपासून दर तासाने मेट्रो उपलब्ध होणार असून नवे वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे.
मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) यांच्या चमूने १९ आणि २० जून रोजी महामेट्रोनागपूर प्रकल्पाची पाहणी केली. सीएमआरएस ने केलेल्या पाहणी नंतर अप मार्गाकरिता सीएमआरएसचे प्रमाणपत्रदेखील महामेट्रोने मिळवले. आता अप आणि डाउन मार्गावर मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येत आहे. याआधी डाउन मार्गावर मेट्रो सेवा सुरू होती. आता अप मार्गावर मिळालेल्या प्रमाणपत्रमुळे ट्रॅक ची लांबी वाढली असल्याने फेऱ्या वाढविणे शक्य झाले असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले. सध्या सीताबर्डी ते खापरी या मार्गावर मेट्रोच्या सकाळी ३ आणि सायंकाळी ३ अशा ६ फेऱ्या सुरू आहेत. २८ जूनपासून दर तासाला १ याप्रमाणे २५ फेऱ्या होणार आहेत.
मेट्रोचे नवे वेळापत्रक (दर तासाला मेट्रो)
डाउन लाइन
स्टेशन : पहिली फेरी : शेवटची फेरी
खापरी स्टेशन : सकाळी ८ : रात्री ८
न्यू एअरपोर्ट : सकाळी ८.८ : रात्री ८.८
एअरपोर्ट साउथ : सकाळी ८.१५ : रात्री ८.१५
एअरपोर्ट : सकाळी ८.१९ : रात्री ८.१९
सीताबर्डी : सकाळी ८.४९ : रात्री ८.४९
मेट्रोचे नवे वेळापत्रक (दर तासाला मेट्रो)
अप लाइन
स्टेशन : पहिली फेरी : शेवटची फेरी
सीताबर्डी : सकाळी ८ : सायंकाळी ७
एअरपोर्ट : सकाळी ८.३० : सायंकाळी ७.३०
एअरपोर्ट साउथ : सकाळी ८.३४ : सायंकाळी ७.३४
न्यू एअरपोर्ट : सकाळी ८.४० : सायंकाळी ७.४०
खापरी : सकाळी ८.४९ : सायंकाळी : ७.४९
इतर महत्त्वाचे
– महामेट्रो लवकरच एयरपोर्ट मेट्रो स्टेशन आणि नागपूर विमानतळदरम्यान शटल सेवा सुरू करीत आहे.
– नागपूर महापालिकेच्या सहकार्याने महामेट्रोने शहराच्या बेलतरोडी भागातून बससेवा सुरू केली आहे. सकाळी ७.४० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत ही सेवा उपलब्ध असेल.