नागपूर : राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प शेतकरी आणि ओबीसी हिताचा अर्थसंकल्प आहे. शेतकरी समृद्धी आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर अर्थसंकल्पात देण्यात आला आहे.
ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी भरीव तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास मंडळासाठी २०० कोटी आणि अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्षासाठी १०० कोटी रुपये तरतूद करून अर्थमंत्र्यांनी समाजाला उत्तम भेट दिली आहे.
सरपंचांच्या मानधन वाढीसाठी २०० कोटी रुपये तरतूद करून न्याय दिला आहे. नवीन औद्योगिक धोरणातून ६० लाख नवे रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. महिलांच्या सक्षमीकरणाकरिताही भरीव तरतूद करीत समाजातील सर्वच घटकांना न्याय दिला आहे. अर्थसंकल्प सर्वसमावेशक असून त्याचे स्वागत आहे.
– नंदा जिचकार, महापौर, नागपूर