नागपूर : जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात आज सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक झडली. त्यात जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. ही चकमक सुरूच आहे.
दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील द्रगड सुगान परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी शोधमोहीम हाती घेतली. त्याचवेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल जवानांनीही गोळीबार केला. यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.
काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर परिसरात गुरुवारी सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना टिपलं होतं. या महिन्यात सुरक्षादलांनी आतापर्यंत २० दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे.
अधिक वाचा : नागपूर : ‘गो-एयर’च्या कर्मचाऱ्याची आत्महत्या