नागपूर : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा झालेला दारुण पराभव आणि काँग्रस अध्यक्ष राहुल गांधी यांची त्यांच्या पारंपरिक अमेठी या मतदारसंघात झालेली हार पाहता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला हवा, असे मत प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी व्यक्त केली आहे. ‘अजूनही राहुल गांधी यांनी राजीनामा कसा दिला नाही?’, अशा शब्दात गुहा यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. ट्विटद्वारे गुहा यांनी हे विधान केले आहे.
राहुल गांधी यांनी आपला आत्मसन्मान. राजकीय उंची दोन्ही गमावले आहे. काँग्रेसला आता एका नव्या नेतृत्त्वाची गरज आहे आणि त्याची मी मागणी करतो, मात्र काँग्रेसकडे असे नेतृत्व नाही, असेही गुहा म्हणाले.
राहुल गांधींचा राजीनामा ?
काँग्रेसच्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी स्वत: राजीनामा देण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. राहुल गांधी यांनी यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा दिल्याचे सूत्रांनी सांगितले. राहुल गांधींच्या राजीनाम्याबाबत २५ मे या दिवशी होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत यावर चर्चा होणार आहे.
गेल्या ५ वर्षांच्या काळात मोदी सरकारवर टीका करणाऱ्या प्रमुख टीकाकारांमध्ये रामचंद्र गुहा यांची गणना होते.
अधिक वाचा : नागपूरात अवैध दारूविक्रेते, गुन्हेगारांची धरपकड