नागपूर : मुंबई विमानतळावरील विमानांची उड्डाणे उशिराने होत असल्याने अनेक प्रवाशांना गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे. रात्री उशिरा हवाईदलाचे एक विमान रनवेवरून घसरल्याने त्याचा विमान वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
बेंगळुरुच्या येलाहानाका एयर फोर्स स्टेशनवर जाण्यासाठी सज्ज असलेले एएन ३२ हे विमान टेकऑफ घेण्यासाठी मुंबई विमानतळाच्या रनवेवर धावायला लागले. पण ११.३२ च्या सुमारास ते रनवेवरून घसरले. लगेच विमानचालकाने हे विमान रोखले त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. सकाळपर्यंत हे विमान रनवेवरून बाहेर काढण्यात आले नव्हते.तांत्रिक बिघाडामुळे हे विमान घसरले असल्याची माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली आहे. लगेच हा रनवे बंद करण्यात आला आहे. सर्व विमानं आता तुलनेने छोट्या असलेल्या कुर्ला-अंधेरी रनवेवर वळवण्यात आली आहेत. यामुळे ५० विमानांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. विमानांच्या उड्डाणालाही बराच वेळ लागतो आहे.
मुंबई विमानतळावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली असून प्रवांशाना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. काही दिवसांपूर्वी जेट एअरवेज बंद पडल्यामुळे एअर इंडियाची सेवा ठप्प झाल्यामुळे प्रवाशांना असाच त्रास झाला होता.
अधिक वाचा : 2 students score 100 pc marks in ICSE class 12 exam for first time