नागपूर : अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीसाठी ८ मे, बुधवारी स्नेहनगर, पांडे ले-आऊटसह शहरातील काही इतर नागरी भागात वीज पुरवठा बंद राहणार आहे.
सकाळी ७ ते ११ या वेळेत पांडे ले आऊट, स्नेहनगर, खामला, मालवीय नगर, सीता नगर, गावंडे ले-आऊट, वाडी, दत्तवाडी, सत्य साई नगर, गजानन नगर, शिवशक्ती नगर, वीणा नगर, आंबेडकर नगर, सकाळी ६ ते १० या वेळेत धरमपेठ पोलिस वसाहत, बोले पेट्रोल पंप परिसर, पत्रकार कॉलनी, टांगा स्टॅन्ड येथील वीज पुरवठा बंद राहील.
त्याचबरोबर सकाळी ८ ते ११ या वेळेत आठ रास्ता चौक परिसर, लक्ष्मी नगर, भेंडे ले आऊट, इंद्रप्रस्थ कॉलनी, राऊत वाडी, मनीष ले आऊट, पन्नासे ले आऊट, प्रज्ञा ले आऊट, प्रताप नगर, अग्ने ले आऊट, हुडकेश्वर, पिपला फाटा, गणेशधाम, नरसाळा, हुडकेश्वर खुर्द आणि बुद्रुक,अभ्यंकर नगर,श्रद्धानंद पेठ, कार्पोरेशन कॉलनी येथील वीज पुरवठा बंद राहील.
दरम्यान सकाळी ७ ते १० या वेळेत अमरावती रोड येथील हिंदुस्थान कॉलनी, गोंड बस्ती, रामनगर येथील वीज पुरवठा बंद राहील. तर ७ ते १०. ३० या वेळेत बेलतरोडी, पद्मावती नगर, रेवती नगर, जग्गनाथ सोसायटी, हरिहर नगर येथील वीज पुरवठा बंद राहील. वाढत्या उन्हामुळे महावितरणने आता देखभाल दुरुस्तीची कामे सकाळी ११ पूर्वी आटोपण्याचा निर्णय घेतला आहे.
अधिक वाचा : विरोधकांना धक्का ; व्हीव्हीपॅट संदर्भातील याचिका SC ने फेटाळली