नागपूर : कुलरच्या शॉकने एका १८ वर्षीय तरुणाचा करुण अंत झाला. ही घटना कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महालातील बडकस परिसरात शुक्रवारी सकाळी घडली.
ऋषिकेश राम आमले असे या तरुणाचे नाव आहे. त्याने यंदाच बारावीची परीक्षा दिली होती. त्याचे वडील शेतकरी असून त्याची आई गृहिणी आहे. त्याला दोन मोठ्या बहिणी असून त्यातील एक बहीण पुण्यात शिकत असून दुसरी बहीण पुण्यातच नोकरी करीत आहे.
ऋषिकेशला शुक्रवारी घरातीलच कुलरचा शॉक लागल्याने तो जागीच कोसळला. त्याच्या कुटुंबीयांनी आणि परिसरातील लोकांनी त्याला सेव्हन स्टार हॉस्पीटल येथे भरती केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
अधिक वाचा : बेरोजगारीच्या दराची एप्रिलमध्ये उसळी