नागपूर : आयसीएआयतर्फे घेण्यात येणाऱ्या सीए अभ्यासक्रमाची परीक्षा पद्धतीमध्ये बदल करण्यात आला आहे. नवीन पद्धतीमध्ये ओएमआर शीटचा प्रयोग वर्णनात्मक आणि वस्तुनिष्ठ पद्धतीच्या कार्यक्रमांसाठी करण्यात येणार आहे. येत्या २७ मेपासून सुरू होणाऱ्या परीक्षांमध्ये ही नवीन पद्धती पहिल्यांदाच वापरण्यात येणार असल्याची माहिती आहे.
परीक्षा पद्धतीमध्ये अधिक पारदर्शकता यावी आणि विद्यार्थ्यांना सहजता वाटावी या उद्देषाने आयसीएआय नियमितपणे परीक्षा पद्धतीमध्ये बदल करत असते. त्याच श्रुंखलेत यंदापासून हा बदल स्वीकारण्यात आला आहे. आयसीएआने यंदापासून इंटरमिडीएट आणि अंतिम वर्षाचे सर्व पेपर बहुपर्यायी उत्तर स्वरुपाचे केले आहेत. यावर तीस टक्के गुण राहणार आहेत. पेपर दोन स्वरुपाचा राहणार आहे. यातील एक भाग बहुपर्यायी उत्तरांचा तर दुसरा वर्णणात्मक स्वरुपाचा राहील. यावर सत्तर टक्के गुण राहतील. वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या प्रश्नांसाठी ओएमआर शीटचा प्रयोग करण्यात येणार आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी पेन्सिलद्वारे योग्य पर्यायाभोवती वर्तुळ करायचे आहे. तर वर्णणात्मक स्वरुपाच्या प्रश्नासाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पेपर संपूर्ण सोडविल्यानंतर ओएमआर शीट जमा करायची आहे. येत्या २७ मेपासून सीए अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू आहेत. त्या १२ जूनपर्यंत राहतील. यामध्ये फाउंडेशन कोर्स, इंटरमिडिएट, अंतिम अभ्यासक्रम यांचा समावेश आहे. जुना आणि नवीन अशा दोन्ही स्वरुपाच्या अभ्यासक्रमांच्या या कालावधीत होतील.
अधिक वाचा : लष्करात प्रथमच महिला जवान; ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू