नागपूर : चिन्नास्वामी मैदानात बेंगळुरूविरुद्ध चेन्नईला अवघ्या एका धावेनं पराभूत व्हावं लागलं. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं स्फोटक खेळी करून सगळ्यांची मनं जिंकली. संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला असला तरी, त्यानं आयपीएलमध्ये एका विक्रमाला गवसणी घातली आहे. आयपीएलमध्ये त्यानं आतापर्यंत २०३ षटकार ठोकले असून, अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. बेंगळुरूविरुद्धच्या लढतीत धोनीनं ४८ चेंडूंमध्ये ८४ धावांची स्फोटक खेळी केली. या तुफानी खेळीत त्यानं ७ उत्तुंग षटकार लगावले. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो २०३ षटकारांसह तिसऱ्या स्थानी पोहोचला. ख्रिस गेलनं ३२३ षटकार, तर एबी डिव्हिलियर्सनं २०४ षटकार ठोकले आहेत. आयपीएलमध्ये २०३ षटकार ठोकणारा धोनी पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्यानंतर चेन्नईचा सुरेश रैना आणि मुंबईच्या रोहित शर्माचा क्रमांक लागतो. या दोघांच्या नावावर प्रत्येकी १९० षटकार आहेत.
अधिक वाचा : पाणीटंचाईचे संकट खोल; १९ गावांना टँकरने पुरवठा