नागपूर : अमरावती मार्गावरी अंबाझरी बायपास भागात भरधाव ट्रकने मोटरसायकलस्वार युवकाला चिरडून ठार केले. ही घटना गुरुवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी ट्रकवर दगडफेक केल्याने तणाव निर्माण झाला होता.
वेळीच अंबाझरी पोलिस तेथे पोहोचले. नागरिकांना शांत केले. त्यामुळे तणाव निवळला. अंकुश शंकरराव पौनिकर ( वय २४, रा. वाठोडा),असे मृताचे नाव आहे. तो फर्निचरचा व्यवसाय करीत होता. अंकुश हा सकाळी एमएच-४९-डब्ल्यू-७३१० या क्रमांकाच्या मोटरसायकलने जात होता. अंबाझरी बाय पास परिसरात एमएच-३६-एफ-१६१८ या क्रमांकाच्या ट्रकने मोटरसायकलला धडक दिली. अंकुश खाली पडला. ट्रक त्याच्या अंगावरुन गेला. अंकुशचा मृत्यू झाला.
अंबाझरी पोलिसांनी प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल करून ट्रकचालक दिलीप नत्थुजी वरखाडे रा. सावरगाव याला अटक केली आहे.
अधिक वाचा : IMA देणार पोलिसांना जीव वाचविण्याचे प्रशिक्षण