नागपूर : राळेगाव तालुक्यातील वडगाव या गावातील श्रीजीत विलासराव हाते या २४ वर्षीय शेतकऱ्याने रात्रीच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. गुढी पाडव्याच्या दिवशी आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावाने चार एकर व मोठ्या भावाच्या नावाने चार एकर शेती आहे. हे दोघेही संयुक्तरीत्या शेती करत होते. मागील काही वर्षांपासून सततच्या नापिकीमुळे आत्महत्या केली असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याआधी ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या वडिलांनी विहिरीमध्ये पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली होती.
अधिक वाचा : मेट्रो चांगलीच, पण नोकऱ्या कुठाय?