कर्करोगावर मात करत इरफान खान भारतात परतला

Date:

मुंबई : बॉलिवूड अभिनेता इरफान खानने त्याच्या गंभीर आजारावर मात केली असून तो मायदेशात परतला आहे. त्याच्या आजारामूळे तो चित्रपट सृष्टीपासून फार काळ दूर होता. ५२ वर्षीय अभिनेता इरफान मागील काही महिन्यांपासून लंडनमध्ये न्यूरो एंडोक्राइन ट्यूमर आजारावर उपचार घेत होता. त्यानंतर आज तो कर्करोगावर मात करत भारतात परतला आहे.

मागील काही दिवसांपासून इरफान खानची परिस्थिती स्थिर असल्याची माहिती मिळाली होती. लवकरच इरफान खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. इरफान खान लवकरच ‘हिंदी मीडियम 2’ चित्रपटात झळकणार आहे. दिग्दर्शक आणि निर्माते तिगमांशु धूलिया यांनी चित्रपटाची अधिकृत घोषणा केली. सध्या चित्रपटाच्या कथेवर काम चालू आहे. २०१८ मध्ये इरफानचा ‘कारवां’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. इरफान मायदेशी पुन्हा परतल्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदाची वार्ता असेल.

अधिक वाचा : ‘दे दे प्यार दे’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related