नागपूर : वीज बिल भरण्यासंदर्भात वारंवार पाठपुरावा करूनदेखील वीज बिलाचा भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अकरा हजार २४० ग्राहकांचा वीजपुरवठा महावितरणने खंडित केला आहे. महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रात वारंवार पाठपुरावा करूनदेखील महावितरणाच्या प्रयत्नांना यश येत नसल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रात १ फेब्रुवारी २०१९ रोजी देय मुदतीत वीज बिलाचा भरणा न केल्याने थकबाकी असलेल्या घरगुती, वाणिज्य आणि औद्योगिक वर्गातील तब्बल १ लाख ७० हजार ९७९ वीज ग्राहकांकडे सुमारे ७० कोटी ३१ लाख रुपयांची थकबाकी जमा झाली होती. यापैकी बहुतांश ग्राहकांनी दोन महिन्यांपासून त्यांच्या वीज बिलाचा भरणा केलेला नव्हता.
महावितरणने सप्टेंबर महिन्यापासून संपूर्ण राज्यभर सुरू केलेल्या केंद्रीकृत बिलिंग प्रणालीमुळे बिलिंगची संपूर्ण प्रक्रिया महावितरणाच्या सांघिक कार्यालयामार्फत करण्यात येते. यातून थकबाकीदार ग्राहकांवर रही सांघिक कार्यालयाकडून विशेष लक्ष दिले जाते. थकबाकीचा वाढता बोजा लक्षात घेता महावितरणतर्फे थकबाकीदारांना पैसे भरण्यासंदर्भात अनेक वेळा सूचना देण्यात आल्या. मात्र, अकरा हजार २४० ग्राहकांनी महाविद्यालयाच्या प्रयत्नांना कोणताही प्रतिसाद न दिल्याने अखेर महावितरणतर्फे त्यांची वीज खंडित करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यावर कारवाईदेखील करण्यात आली.
अधिक वाचा : Paucity of coal may hike power tariff in State