नागपूर : तब्बल ३४ वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे नागपुरात २२ ते २५ फेब्रुवारीदरम्यान आयोजन करण्यात येणार आहे. या संमेलनासाठीच्या ‘लोगो’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी अनावरण करण्यात आले. अनेक वर्षांनंतर नागपुरात होणारे हे संमेलन निश्चित दर्जेदार ठरेल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्र्यांनी दिला.
आजवर देशविदेशात अनेक नाट्य संमेलने झालेली आहेत. पण नागपूरकरांसाठी बऱ्याच कालावधीनंतर हे संमेलनात होणार असल्यामुळे नाट्यकर्मींमध्ये उत्साह आहे. या संमेलनासाठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेने बराव पाठपुरावा केल्यानंतर हे संमेलनात नागपुरात होत आहे. संमेलनाचे अध्यक्षपद विदर्भाचेच ज्येष्ठ रंगकर्मी प्रेमानंद गज्वी भूषविणार असून उद्घाटनही विदर्भाचे ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या हस्ते होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे संमेलनाध्यक्ष असून मुख्यमंत्री प्रमुख मार्गदर्शक आहेत.
लोगो अनावरण प्रसंगी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईचे उपाध्यक्ष नरेश गडेकर, मनपाचे सत्तापक्ष नेते व स्वागत समिती संयोजक संदीप जोशी, प्रमुख निमंत्रक प्रफुल्ल फरकासे, स्वागत समितीचे सरचिटणीस किशोर आयलवार यांची प्रमुख उपस्थिती होती. नाट्य संमेलनासाठी नाट्य परिषदेने रेशीमबाग बस स्टॉपसमोर, रेशीमबाग येथे नवीन कार्यालय तयार केले असून त्याचे उद्घाटन येत्या, ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते होणार आहे.
अधिक वाचा : नागपुर के श्री. राजेंद्र जायस्वाल ने गणतंत्र दिवस पर तिरंगे के साथ इतिहास रचा !