नागपूर : रेल्वे विभागाने उस्ताद नावाच्या रोबोटची निर्मिती केली आहे. हा रोबोट यांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांना रेल्वेची देखभाल करण्यास मदत करण्यासाठी तयार करण्यात आला आहे.
हा उस्ताद एचडी कॅमेरा आणि सेंसरयुक्त आहे. त्यामुळे यातील कॅमेऱ्यानुसार कोचमधील स्पेअर पार्टचे छायाचित्र आणि व्हिडिओ थेट नियंत्रण कक्षाला मिळतात. तर रेल्वेमधील कोणतीही दुरुस्ती करताना चूक झाली तर ती मानवी चूक या रोबोटद्वारे दुरूस्त करता येते. नियंत्रण कक्षातील अभियंता अँड्राईड ऍपच्या सहाय्याने या रोबोटला नियंत्रित करू शकतात. वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता अखिलेश चौबे यांनी याची निर्मिती केली आहे.
अधिक वाचा : नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी