नागपूर : प्रभागातील नागरिकांना रोजच पाणी, गडर लाईन, विद्युत दिवे या सारख्या मुलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. या समस्यांना प्राधान्य देउन त्या तातडीने सोडवा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. ‘महापौर आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत शुक्रवारी (ता. २८) महापौर नंदा जिचकार यांनी गांधीबाग झोनमधील समस्यांचा आढावा घेतला.
यावेळी आमदार गिरीश व्यास, वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती मनोज चापले, गांधीबाग झोन सभापती वंदना यंगटवार, माजी महापौर प्रवीण दटके, नगरसेविका सुमेधा देशपांडे, नेहा वाघमारे, आशा नेहरू उईके, नगरसेवक जुल्फेकार भुट्टो, माजी नगरसेवक बंडू राउत, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय/ओ.ॲण्ड एम.) मनोज गणवीर, कार्यकारी अभियंता (स्लम) राजेंद्र रहाटे, सहायक आयुक्त अशोक पाटील, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, झोनल अधिकारी सुरेश खरे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रारंभी महापौर नंदा जिचकार यांनी गांधीबाग झोनमधील नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी मालमत्ता व पाणी कर वसुलीसंदर्भात संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून आढावा घेतला. करवसुलीचा वेग वाढवा आणि १०० टक्के उद्दिष्ट गाठा, असे निर्देशही त्यांनी दिले. प्रभाग १८ मधील गंगाबाइर घाट पुलाचे बांधकाम थांबून असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी यावेळी महापौर नंदा जिचकार यांच्याकडे केली.
महापौरांनी पुलाच्या बांधकामाबाबत आढावा घेउन येत्या ३ महिन्यामध्ये कोणत्याही अडथळ्याविना बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिका-यांना दिले. याशिवाय गंगाबाई घाटाच्या सौंदर्यीकरणाच्या प्रस्तावाला महापौरांनी हिरवी झेंडी दाखविली. गंगाबाई घाटाच्या सौंदर्यीकरणासाठी एक कोटीच्या निधीला स्थायी समितीने मंजुरी प्रदान करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. गंगाबाई घाटाच्या सौंदर्यीकरणाच्या कामासंबंधीची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करून कामाला सुरूवात करण्याचेही महापौर नंदा जिचकार यांनी निर्देशित केले.
प्रभाग ८ मधील मोमिनपुरा भागात महापौरांनी यावेळी दौरा केला. या भागात मोठ्या प्रमाणात पाणी, गडर लाईन, विद्युत दिव्यांची समस्या आहे. शिवाय अनेक ठिकाणी पाणी लिकेज असून विजेची तार रत्यावर लोंबकळत आहेत, ट्रंक लाईन चोक असल्याने पाणी रस्त्यावर वाहत आहे, अनेक ठिकाणी अतिक्रमणामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा अनेक तक्रारींचा पाठा नागरिकांनी महापौरांपुढे वाचला. प्रत्येक नागरिकाला पिण्याचे पुरेसे पाणी मिळणे हा त्यांचा हक्क आहे. पाणी, विद्युत दिवे, गडर लाईन या मुलभूत सुविधांसाठी नागरिकांना त्रास होउ नये यासाठी तातडीने या समस्या सोडवा असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी संबंधित अधिका-यांना दिले.
महानगरपालिकेमध्ये कार्यरत कर्मचा-यांच्या कामावर देखरेख राहावी, त्यांनी शिस्तीमध्ये काम करावे यासाठी मनपातर्फे त्यांना ‘जीपीएस वॉच’ देण्यात आल्या आहेत. मात्र अनेक कर्मचारी ती घड्याळ न वापरता कामचुकारपणा करतात. अशा कर्मचा-यांनावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी दिले.
अधिक वाचा : पुलिस आयुक्त द्वारा पुलिस उपहारगृह का उट्घाटन : कर्मचारियों को मिलेगा अच्छा लाभ