नागपूर : रायगडच्या जिल्हाधिकारी, पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी काम केलेल्या शीतल उगले यांची आता नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापती म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
उगले या भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) २००९च्या बॅचच्या अधिकारी आहेत. रायगडच्या जिल्हाधिकारी म्हणून शीतल उगले यांनी काम केले आहे. पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून त्या कार्यरत होत्या. उगले यांचा कारभार मनपानी असल्याचे सांगत त्यांना हटविण्यासाठी भाजपच्या ९८ पैकी तब्बल ७० नगरसेवकांनी स्वाक्षरी अभियान राबविले. महापालिकेच्या ताब्यात असलेल्या काही समित्यांच्या निर्णयांना उगले यांनी विरोध केला होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर उगळे यांची नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापतिपदी नेमणूक झाली आहे.
‘एनएमआरडीए’च्या आयुक्तपदी मुद्गलच
नागपूर सुधार प्रन्यास बरखास्तीचा निर्णय झाला आहे. नासुप्रचा सर्व कारभार महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सध्या नासुप्रचे सभापती म्हणून अश्विन मुद्गल यांच्याकडे जबाबदारी आहे. शहराबाहेरील ७१९ गावांसाठी म्हणजे मेट्रोरिजनसाठी एनएमआरडीए म्हणजे नागपूर महानगर विकास प्राधिकरण निर्माण करण्यात आले आहे. या महानगराच्या आयुक्तपदी सध्या अश्निन मुद्गल आहेत. उगले यांनी नेमणूक केवळ नासुप्र सभापती म्हणून झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
अधिक वाचा : महाराष्ट्र ठरले महापौर चषकाचे मानकरी