मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाल्याने आता सरकारी नोकरभरतीवरील बंदी उठविण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. त्यामुळे राज्यात लवकरच 70 हजार पदांची भरती केली जाणार आहे.राज्य सरकारने नोकरभरतीला दिलेली स्थगिती उठवून 70 हजार पदे भरण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मराठा आरक्षणाआधी ही भरती झाली तर मराठा समाजाला या भरतीत आरक्षण मिळणार नाही. म्हणून जोपर्यंत मराठा आरक्षण लागू होत नाही, तोपर्यंत नोकरभरती करू नये, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नोकर भरतीचा निर्णय मागे घेत मराठा आरक्षण लागू येईपर्यंत नोकरभरती करणार नसल्याचे जाहीर केले होते.
अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना आमदार छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाले, आता 70 हजार रिक्त पदे केव्हा भरणार, असा प्रश्न विचारला. या प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाल्याने शासकीय नोकरभरती सुरू करण्याची घोषणा केली.
अधिक वाचा : शाळांनी भिकेचा वाडगा घेऊन सरकारकडे येऊ नये, माजी विद्यार्थ्यांकडे जावं – प्रकाश जावडेकर