नागपूर : राज्याच्या विधिमंडळात गुरुवारी (ता. २९) मराठा आरक्षण विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर नागपूर महानगरपालिकेतील सत्तापक्षातील पदाधिकारी व नगरसेवकांनी गुलाल उधळून आणि मिठाई वाटून एकच जल्लोष केला.
महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, उपनेत्या वर्षा ठाकरे, प्रतोद दिव्या धुरडे, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, स्थापत्य समिती सभापती संजय बंगाले, परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे, कर आकारणी समितीचे सभापती संदीप जाधव, झोनचे सभापती प्रमोद कौरती, विशाखा बांते, रिता मुळे, रूपाली ठाकूर, प्रकाश भोयर, संगीता गिऱ्हे, भाजपचे नेते जयप्रकाश गुप्ता यांच्यासह सत्तापक्षातील सर्व नगरसेवक, नगरसेविका यांची उपस्थिती होती.
यावेळी ढोल-ताशांच्या तालावर पदाधिकारी व नगरसेवकांनी जल्लोष केला. गुलाल उधळून आणि मिठाई वाटून आनंद व्यक्त केला आणि शुभेच्छा दिल्या. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे यावेळी समस्त पदाधिकारी व नगरसेवकांनी आभार मानले.
अधिक वाचा : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची कार्यशाळा