नागपूर : पेस्ट मॅनेजमेंट असोसिएशन तर्फे 2 दिवसीय कार्यशाळा २४ ते २५ नोव्हेंबर, २०१८ रोजी चिटणवीस सेंटर येथे घेण्यात आली.
या कार्यशाळेत नागपूर, पुणे, अमरावती, अकोला, इंदोर, रायपुर, दुर्ग, भिलाई येथून ६५ पेक्षा जास्ती लोकांची उपस्थिती होती.
यात डॉ. सारंग सावलेकर (प्रेसिडेंट), पी.एम.ए., डॉ. गिरीश ढेंगे, रॉसलाईफ सायन्स, डॉ. रश्मी पांडे, एंटोमोलॉजिस्ट यांच्या तर्फे पेस्ट कंट्रोल मधील ऍडव्हान्स पद्धती व मापके व पेस्ट कंट्रोल करताना काय काळजी घ्यायला हवी याबद्दल प्रात्यक्षिक व मार्गदर्शन करण्यात आले.
विशेष अतिथी म्हणुन डॉ. नेहारकर, असोसिएट प्रोफेसर, एंटोमोलॉजि डिपार्टमेन्ट, पंजाबराव कृषी महाविद्यालय यांनी प्रत्येक पार्टिसिपेन्टसाठी हि कार्यशाळा किती महत्वाची आहे व यातून मिळणारे ज्ञान हे आपल्याला चांगली सर्विस प्रोव्हाइड करायला मदत करेल हे पटवून दिले.
बायर क्रॉप आणि यू.पी.ए.ल. यांच्यातर्फे त्यांच्या पेस्टीसाईड मॅनुफॅक्चर मोलेक्युलस व मशिनरीज यांच्याबद्दल प्रायोगिक प्रात्यक्षिक दाखवण्यात आली. या कार्यशाळेत सहभागी साठी हि कार्यशाळा ज्ञान तसेच माहिती साठी फायद्याची ठरली असल्याचे सांगण्यात आले. व याप्रकारची कार्यशाळा पुढे व भविष्यात हि पेस्ट मॅनेजमेंट असोसिएशन तर्फे घेण्यात यावी असे आवाहन केले.
या कार्यशाळेत कार्यशाळेवर आधारित पार्टीसिपंट ला प्रश्नपत्रिका देण्यात आली व त्यानंतर प्रत्येकाला सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आले.
अधिक वाचा : जर्मन शिष्टमंडळाचे महापौरांनी केले स्वागत : दोन दिवसीय कार्यशाळेत घेणार सहभाग