डॉ.आशिष देशमुख यांचा राजीनामा मंजूर

Date:

विदर्भातील भाजपाचे बंडखोर आमदार डॉ.आशिष देशमुख यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. विधानसभेचे अध्यच हरिभाऊ बागडे यांनी आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी देशमुख यांचा राजीनामा मंजूर करण्यात आल्याची घोषणा सभागृहात केली. देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे भाजप आमदारांची संख्या 121 वर आली आहे.

काटोल विधानसभा मतदारसंघातील भाजपा आमदार डॉ.आशिष देशमुख हे गेल्या काही महिन्यांपासून नाराज होते. विदर्भातील तरूण आणि शेतकरी हे अतिशय हलाखीच्या अवस्थेत असून सरकार त्यांना दिलासा देण्यासाठी काहीही करीत नसल्याने देशमुख यांनी सरकारवर नाराजी व्यक्त करीत राजीनामा देण्याची घोषणा केली होती. त्यासंदर्भात देशमुख यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहित राजीनामा दिला होता. त्यानुसार विधानसभा अध्यक्षांनी आज आशिष देशमुख यांचा राजीनामा मंजूर केल्याचे सभागृहात सांगितले. विशेष म्हणजे स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीवरून त्यांनी आधीही राजीनाम्याचा इशारा दिला होता.

अधिक वाचा : विविध मागण्यांसाठी तरुणांची शहर बसवर दगडफेक

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related