वैनगंगा नदीत प्रेमीयुगलाची आत्महत्या

Date:

नागपूर-भंडारा जिल्ह्याच्या वैनगंगा नदीत एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. दोन दिवसाअगोदर त्यांनी सामूहिक आत्महत्या केल्याचे प्रथम दर्शनी समोर येत आहे. या दोघांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी भंडारा जिल्हा रुग्णालयात आणले आहे. मृत पावलेल्या मुलाचे नाव विशाल गणेश शेंडे (22) असून तो मुळचा जवाहर नगर पेट्रोल पंप (ठाणे) येथील रहिवाशी आहे. विशाल मजुरीचे काम करत होता. तर मुलगी चांदोरी येथील रहिवाशी असून दीक्षा मारबते असे तिचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दीक्षा आणि विशाल नात्यात मावस बहिणभाऊ लागतात. बहुतेक याच कारणामुळे या दोघांच्या प्रेमप्रकरणाला आणि लग्नाला घरच्यांचा विरोध असावा. त्यामुळेच या दोघांनी आत्महत्येचा निर्णय घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.

सोमवारी ९ वाजताच्या दरम्यान कारधा गावाच्या वैनगंगा नदीतीरावर लोकांना 2 मृतदेह एकमेकांनी बिलगून पाण्यावर तरंगताना दिसले. याविषयीची माहिती कारधा पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरुन ढिवर बांधवांच्या सहाय्याने दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले. मृतदेह बाहेर काढल्यानंतर लक्षात आले की, हे दोन्ही प्रेमीयुगुल असून यांनी आत्महत्ये अगोदर एकमेकांच्या हातांना ओढणीने बांधून घेतले होते. त्यामुळे मरण पावल्यानंतर दोघांचे मृतदेह एकमेकांच्या सोबतच होते. त्यांच्या जवळ असलेल्या मोबाईलवरुन त्यांची ओळख पटवण्यात आली आहे.

विशालच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, विशाल हा गुरुवारी घरामधून सायंकाळी 6 वाजता 100 रुपये घेऊन आत्याकडे मंडईसाठी जात असल्याचे सांगून निघून गेला. त्यानंतर सोमवारी सकाळी त्याचा मृतदेह कारधा गावातील वैनगंगा नदीच्या तिरावर मिळाल्याची माहिती मिळाली. त्यांनी घटना स्थळावर येऊन पाहणी केली असता विशालची आणि मुलीची ओळख पटवली.

अधिक वाचा : क्राइम ब्रांच ने किया ऑनलाइन सेक्स रैकेट का पर्दाफाश : एक दलाल गिरफ्तार

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related