नागपूर : दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील नागरिकांसाठी अटल आरोग्य महाशिबिराच्या माध्यमातून आयोजित आरोग्यदायी महायज्ञात 42 हजारांवर गरीब व गरजू रुग्णांवर औषधोपचार करण्यात आले. डोळ्यांच्या विकार असलेल्या सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. याशिवाय फिजिओथेरपीसाठी आलेल्या 243 रुग्णांची नोंदही शिबिरात झाली.
उद्घाटन होण्यापूर्वीच सकाळी साडेनऊ वाजतापासून रुग्णांच्या नोंदणीला सुरुवात झाली. दिवसभरात 42 हजार 155 रुग्णांची नोंदणी झाली. विविध शस्त्रक्रियांची गरज असलेल्या रुग्णांवर मेडिकल किंवा संबंधित धर्मादाय तसेच खासगी रुग्णालयात टप्प्या-टप्प्याने शस्त्रक्रिया करण्यात येतील. नेत्रविकाराचे आठ हजार 975 जणांची तपासणी करण्यात आली. यातील एक हजार 827 व्यक्तींमध्ये नेत्रदोष आढळला. यांना लवकरच चष्म्याचे वितरण करण्यात येतील. मेडिसीन विभागाच्या स्टॉलवर सात हजार 125 रुग्णांची नोंद झाली. हाडाशी संबंधित विकाराच्या सात हजार 777 रुग्णांनी स्टॉलवर उपचार घेतले. आयुर्वेदाच्या स्टालवर तीन हजार 795 रुग्णांनी उपचार घेतले.
शिबिरामध्ये विविध पॅथींच्या 750 डॉक्टरांकडून सेवा देण्यात आली. सुमारे पाचशेवर परिचारिका, आरोग्यसेविका, आशा वर्कर यांनी मदत केली. ऍलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथीचे सुमारे 80 बाह्यरुग्ण विभाग होते.
अधिक वाचा : महाल टिळक पुतळा परिसरात ‘पोर्णिमा दिवसा’निमित्त जनजागृती