नागपूर : नागपूर शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. या कामांची नगरसेवकांना माहिती देण्यासाठी नागपूर महानगरपालिका, इक्वी सिटी आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (ता.२३) ला राजे रघुजी भोसले नेताजी नगर भवन महाल येथे नगरेसेवकांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेचे उद्घाटन महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे, बसपा गट नेते मोहम्मद जमाल, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रामनाथ सोनवणे, सहायक आयुक्त (साप्रवि) महेश धामेचा, जयंत पाठक प्रामुख्याने उपस्थित होते.
स्मार्ट सिटीच्या यादीत नागपूरचे नाव दुस-या फेरीत आले. तेव्हापासून शहराचा विकास झपाट्याने वाढलेला आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत क्षेत्राधिष्ठित विकास, पॅन सिटी यासारख्या कामांची लोकप्रतिनिधींना माहिती देण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे जयंत पाठक यांनी प्रास्ताविकाद्वारे सांगितले.
स्मार्ट सिटीच्या पॅन सिटी सोल्युशन्सअंतर्गत नागपूर शहरात विविध ठिकाणी सिसिटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. हा उपक्रम राज्यातील नव्हे तर देशातील पहिला उपक्रम आहे.
अधिक वाचा : रुग्णांचा सकारात्मक दृष्टिकोन हेच आपले यश : रवींद्र ठाकरे