सांडू आयुर्वेदिक गौरव सोहळा २०१८
नागपुर : आयुर्वेदिक शास्त्र हे सर्वात सुलभ शास्त्र आहे, देशाच्या प्रगति करता प्रत्येक गोष्ट स्वीकारण्याची गरज आहे आणि ती मनोवृत्ति आयुर्वेद ने स्वीकारली आहे. आयुर्वेद शास्त्राबद्दल जगाला स्वतः कडे वळविण्यासाठी आपल्यामध्ये असलेल्या सामर्थ्याची जाणीव जगाला करुन देणे महत्वाचे आहे, असे वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.
भागवत हे सांडू ब्रदर्स तर्फे आयोजित सांडू आयुर्वेदिक गौरव पुरस्कार सोहळा या प्रसंगी बोलत होते. रविवारी शहरात सुरेश भट सभागृहात सांडू आयुर्वेदिक गौरव पुरस्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला गोव्याचे विधानसभा अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्य मंत्री आयुष मंत्रालय भारत सरकार चे श्रीपादजी नाइक आणि प्रसिद्द वैद्य कुलदीप राज कोहली, संचालक आयुष मंत्रालय महाराष्ट्र उपस्थित होते.
पश्चिमात्य संस्कृतीसोबत पाश्चिमात्य उपचार पद्धती देखील भारतात अधिराज्य गाजवत आहे. मात्र, आयुर्वेद शास्त्र हे पौराणिक असून आयुर्वेदाचा उपयोग आणि त्यांचे महत्व तितकेच जुने आणि अनन्य साधारण आहे. आयुर्वेद भारताबरोबरच विदेशातही तितकेच प्रसिद्ध आहे. बाहेर देशात देखील आयुर्वेदाचा उपयोग केला जात आहे, असे प्रमोद सावंत यांनी सांगितले. देशात बत्तीस पेक्षा जास्त आयुर्वेदिक औषधि वनस्पति च्या उपयोग केला जातो त्यांची लागवड प्रचार व प्रसार प्रामुख्याने व्हायला हवा ऐसे मत कुलदीप राज कोहली यांनी व्यक्त केले.
अधिक वाचा : सॉफ्टवेअर अद्ययावत प्रक्रीया तीन महिन्यात पूर्ण करणार