गेल्या काही दिवसांपासून अभिनेते नाना पाटेकर जैसलमेरमध्ये साजिद नाडियाडवाला निर्मित ‘हाऊसफुल ४’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होते. नाना सध्या तनुश्री दत्ता वादात अडकले असले तरी ‘हाऊसफुल ४’मध्ये त्यांच्या भूमिकेबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. नाना या चित्रपटात एका गझल गायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा सुरू आहे.
‘हाउसफुल ४’ चित्रपटातील नानांची भूमिका गुलदस्त्यात ठेवण्यात आली होती. विनोदी चित्रपट असल्यानं नानांची भूमिकाही विनोदीच असणार आहे यात शंकाच नाही. यापूर्वी देखील ‘वेलकम’सारख्या चित्रपटांमध्ये नानांनी विनोदी भूमिका साकरल्या आहेत. फराह खाननं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘हाऊस फुल ४’ टीमचा फोटो शेअर केला आहे. यात नाना पाटेकरदेखील आहेत.
या चित्रपटाच्या शूटिंगसाठी नाना राजस्थानच्या जैसलमेरमध्ये होते. तेथील शूटिंग संपल्यानंतर नाना पाटेकर जोधपूर येथून विमानानं मुंबईत दाखल झाले. मुंबई दाखल होताच पत्रकारांनी त्यांना विमानतळावरच गाठलं. मात्र अजूनही तनुश्री वादावर पूर्णपणे बोलण्यास नानांनी नकार दिला आहे.
अधिक वाचा : ‘प्रवास’च्या निमित्ताने सलीम–सुलेमान जोडीचे मराठीत पदार्पण