नागपूर : शिर्डी येथल साईबाबा देवस्थानाने इंदिरा गांधी शासकीय मेडीकल कॉलेज व रूग्णालयात एमआरआय युनिट स्थापन करण्यासाठी १२ कोटींचा निधी दिला आहे. त्या निधीतून लवकरात लवकर एमआरआय युनिट स्थापन करण्यात यावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिला.
मेयोमध्ये १९८६ पासून डिप्लोमा इन रेडिओ डायग्नोसिस हा अभ्यासक्रम आहे. परंतु, त्याला भारतीय वैद्यक परिषदेची मान्यता नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सदर अभ्यासक्रमाला एमआयसीची परवानगी देण्याबाबत आवश्यक असणाऱ्या सोयी व सुविधा निर्माण करण्याचे आदेश द्यावेत, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली.
दरम्यान, मेयोत एम आर आय युनिट स्थापन झाल्याशिवाय कोर्सला मान्यता देण्यात येणार नाही, असे एमसीआयने स्पष्ट केले होते. त्यानंतरही एमसीआयने रेडियोलॉजी पदव्युत्तर कोर्सला मंजूरी दिली होती. त्यामुळे डिप्लोमा कोर्सशी भेदभाव करण्यात येत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता. तेव्हा न्यायालयाने याप्रकरणी राज्य सरकारला उत्तर सादर करण्याचा आदेश दिला होता. त्याच कालावधीत शिर्डी येथील देवस्थानने मेयोत एमआरआय युनिट स्थापन करण्यासाठी १२ कोटीचा निधी दिल्याची माहिती राज्य सरकारने हायकोर्टात सादर केली. तेव्हा त्यावर सुनावणी करताना न्या. रवी देशपांडे व न्या. अरूण उपाध्ये यांनी मेयोत एमआरआय युनिट तातडीने स्थापन करण्याचा आदेश दिला. तसेच याचिकेवर आता पुढील आठ आठवड्यानंतर सुनावणी निश्चित केली. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. भानुदास कुळकर्णी यांनी बाजू मांडली.
अधिक वाचा : शहर में बड़े ही उत्साह के साथ मनाई गई महात्मा गांधी की १५० वी जयंती