नागपूर : साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी संचालित सरस्वती विद्यालयाला १२५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर वॉकथॉन आणि ‘रन फॉर एज्युकेशन’ या उपक्रमांचे आयोजन २९ सप्टेंबर, शनिवारी सकाळी ६ वाजता शंकरनगरातून आयोजित केले आहे. सरस्वती विद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून याला सुरुवात होईल व त्याचठिकाणी याचा समारोप होईल.
यात दोन किलोमीटरची स्पर्धा इयत्ता सहावी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असून सरस्वती विद्यालय, एलएडी कॉलेज, व्हीएनआयटी चौक, बजाजनगर चौक आणि समारोप सरस्वती विद्यालय येथे होईल. तीन किलोमीटरची इयत्ता ९ ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सरस्वती विद्यालय, एलएडी कॉलेज, व्हीएनआयटी चौक, श्रद्धानंद पेठ चौक, बजाजनगर चौक आणि परत सरस्वती विद्यालय असा मार्ग असेल. तर २ किलोमीटरच्या वॉकथॉनचा मार्ग सरस्वती विद्यालय, एलएडी कॉलेज चौक, व्हीएनआयटी चौक, बजाजनगर चौक आणि परत सरस्वती विद्यालयाजवळ याचा समारोप होईल. आतापर्यंत यासाठी ६५० स्पर्धकांनी त्यांची नोंदणी केली आहे. या स्पर्धेनंतर पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम होईल.
अधिक वाचा : नागपूर येथे शेफ विष्णू मनोहर करणार तीन हजार किलो खिचडीचा विश्वविक्रम