टीम इंडियाची सलामीची यशस्वी जोडी अशी ओळख असलेल्या सचिन-सेहवाग या जोडीला रोहित शर्मा आणि शिखर धवन या जोडीने पछाडले आहे. आशिया कपमधील काल झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात या जोडीने शंभर धावांची भागीदारी केली आणि सचिन-सेहवाग या जोडीचा विक्रम मोडीत काढला.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग या जोडीने सलामीला येऊन १२ वेळेस शंभरहून अधिक धावांची भागीदारी केली होती. सचिन-सेहवागने ९३ डावांत ४२.१३ च्या सरासरीने ३ हजार ९१९ धावा केल्या. रोहित शर्मा आणि शिखर धवन या जोडीने सलामीला येऊन १३ वेळेस शंभर पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली आहे. त्यामुळे रोहित-शिखर ही जोडी भारताची सर्वात यशस्वी दुसरी सलामीची जोडी ठरली आहे. पहिल्या स्थानावर सचिन तेंडुलकर-सौरभ गांगुली ही जोडी आहे. या जोडीने १३६ डावात २१ वेळा संघाला शतकी भागीदारी करुन दिली आहे. या जोडीने सलामीला येऊन ६ हजार ६०९ धावा केल्या.
वनडे सामन्यात सलामीला येऊन सर्वात जास्त शतके बनवण्याच्या यादीत सचिन-सौरभनंतर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज अॅड्म गिलख्रिस्ट आणि मॅथ्यू हेडन या जोडीचे नाव आहे. वेस्ट इंडिजचे दिग्गज सलामीवीर गोर्डन ग्रीनीच आणि डेसमंड हैंसने १५ वेळा शतकी भागीदारी केली आहे. रोहित शर्मा आणि शिखर धवन या जोडीने पहिल्या विकेटसाठी २१० धावांची भागीदारी केली. या जोडीच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली. वीरेंद्र सेहवगा-गौतम गंभीर या जोडीने केलेल्या २०१ धावांचा विक्रम त्यांनी काल मोडीत काढला.
अधिक वाचा : Bajrang Punia : I wish to know the reason for being ignored for Khel Ratna award