नागपूर : सॅनफ्रान्सिस्को येथे आयोजित पर्यावरणावरील परिषदेला सोबत चालण्यासाठी मी आधी महापालिकेतील अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना विचारले होते. परंतु कोणीही तयार नव्हते त्यामुळे मुलाला खाजगी सहायक म्हणून सोबत घेऊन गेले मुलाला सोबत नेऊन मी कुठलीही निवडणूक कुठलीही फसवणूक किंवा चुकीचे काम केले नाही अशा शब्दात महापौर नंदा जिचकार यांनी त्यांच्या वादग्रस्त अमेरिका दौऱ्याबाबत प्रसारमाध्यमांकडे खुलासा केला शुक्रवारी शहरात पसरल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. सॅनफ्रान्सिस्को जी कॉन या मंडळावर मला सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले असल्यामुळे त्यांच्या निमंत्रण विचार मी तिकडे गेले होते प्रवास फार लांबचा असल्याने मी मुलाला घेऊन येईल असे आयोजकांना सांगितले होते त्याला खाजगी सचिव म्हणून नाहीतर खाली साहेब म्हणून घेऊन गेले होते मला तिथे सादरीकरण करायचे होते आणि त्यासाठी आवश्यक तांत्रिक माहिती त्याला होती त्यामुळे त्याला घेऊन गेले ज्यावेळी मला जायचे होते त्यादिवशी महापालिकेत या विषयाबाबत माहिती असलेले सक्षम अधिकारी उपलब्ध नव्हते मुलाला घेऊन गेल्यामुळे त्याची बरीच मदत झाली आणि यात काहीच गैर नाही कुठली ही बनवाबनवी केली नाही या परिषदेसाठी मुलाला नोंदणी सुद्धा वडाफोन कंपनीच्या नावाने केली होती. खाजगी सहायक म्हणून कोणालाही आणू शकता असे जी कॉनने जाण्याआधी सत्ता पक्षासह उपमहापौरांना सांगितले होते असेही स्पष्ट त्यांनी केले.
अधिक वाचा : एम्प्रेस मॉलसह कळमना येथील देह व्यापाराच्या अड्ड्यांवर धाड; SSB ची कारवाई