मुंबई: येत्या 2 सप्टेंबरपासून सलग आठ दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार असल्याचा मेसेज सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. मात्र हा मेसेज खोटा असून त्यात काही तथ्य नसल्याचे समोर आले आहे. ग्राहकांनी आपले बँकिंग व्यवहार सुरू ठेवावेत, असे आवाहन बँकिंग क्षेत्रातील तज्ञांनी केले आहे. 2 सप्टेंबरला रविवार असल्यामुळे बँका बंद राहतील. 3 सप्टेंबरला दहीहंडी असली तरी या दिवशी बँका सुरू राहणार आहेत. तसेच 4 आणि 5 सप्टेंबरला रिझर्व्ह बँकेचा संप आहे, मात्र या संपाचा मुंबई शहरातील किंवा राज्यातील कोणत्याही बँकेशी संबंध नाही. त्यामुळे या दिवशीही बँकाचे व्यवहार सुरूच राहतील. 6 आणि 7 सप्टेंबरला बँका नेहमीप्रमाणे सुरू राहतील. 8 सप्टेंबरला दुसरा शनिवार असल्याने काही बँका बंद राहतील. तर 9 सप्टेंबरला रविवार असल्याने बँका बंद राहतील. म्हणजेच 1 ते 8 सप्टेंबर या कालावधीत शनिवार-रविवारच्या सुट्टय़ा वगळता बँका सुरू राहणार आहेत.
हेही वाचा : राज्य परिवहन महामंडळाने ई-बस सेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस