भारतीय स्टेट बँकेने देशभरातील १२९५ शाखांचे IFSC कोड बदलले

Date:

भारतीय स्टेट बँकेने देशभरातील १ हजार २९५ शाखांचे नाव आणि आयएफएससी कोड बदलले आहेत. संलग्न बँकांचे स्टेट बँकेत विलीनीकरण झाल्याच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

एप्रिल २०१७ मध्ये स्टेट बँक ऑफ बीकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ पतियाळा, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ म्हैसूर आणि भारतीय महिला बँक अशा सात संलग्न बँकांचं स्टेट बँकेत विलीनीकरण करण्यात आलं होतं. त्यानंतर आता पुढचं पाऊल म्हणून १ हजार २९५ शाखांची नावे आणि त्यांचे आयएफएससी कोड बदलण्यात आले आहेत.

शाखेचे बदललेले नाव आणि आयएफएससी कोड याची तपशीलवार माहिती स्टेट बँकेच्या वेबसाइटवर देण्यात आलेली आहे. दरम्यान, स्टेट बँक ठेवींच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठी बँक आहे. देशभरात या बँकेच्या २२ हजार ४२८ शाखा आहेत.

हेही वाचा : सॅटर्डे क्लबतर्फे राज्यस्तरीय ‘ उद्योगकुंभ २०१८ ’ चे आयोजन, नामवंत उद्योजकांची असणार उपस्थिती

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related