नवी दिल्ली – केरळमधील आस्मानी संकटामुळे आलेल्या पुरामुळे अनेकजण विस्थापित झाले आहेत. याचदरम्यान केरळच्या पूरग्रस्त नागरिकांना विदेशातूनही मदत मिळत आहे. केरळला संयुक्त अरब अमीरात (युएई) यांनी ७०० कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव दिला आहे. पण युएईकडून केली जाणारी मदत स्वीकारली जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
युएई सरकारने ७०० कोटी रुपये मदत देण्याचा प्रस्ताव दिल्याचे मंगळवारी मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी सांगितले होते. पण केंद्र सरकार ही मदत नाकारण्याची चिन्हे दिसत आहेत. याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार विदेशाकडून कोणत्याही प्रकारची मदत स्वीकारत नसल्यामुळे युएई सरकारने दिलेल्या प्रस्तावावरही हे लागू असणार आहे. परराष्ट्र मंत्री यांच्याद्वारेच याचा अंतिम निर्णय हा घेतला जाणार आहे. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने असे म्हटले आहे, की आतापर्यंत मदतीचा असा कोणताही प्रस्ताव प्राप्त झाला नाही. परदेशात राहणारे भारतीय नागरिक केरळच्या मुख्यमंत्री मदत निधीला देणगी पाठवू शकतात, ही देणगी कर-मुक्त असेल.
हेही वाचा : केरल बाढ़ : केरल के लिए पीएम मोदी ने 500 करोड़ रुपये की आर्थिक मदद की घोषणा की