खेळत असताना गळफास लागल्याने नऊ वर्षीय मुलाचा मृत्यू

खेळत असताना गळफास लागल्याने नऊ वर्षीय मुलाचा मृत्यू

सोलापूर: सांगोला तालुक्यात स्वेटरची  लेस लाकडी खुंटीला बांधून खेळत असताना गळफास लागल्याने नऊ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. सोहम नागनाथ शेंडे, असे बालकाचे नाव आहे. हि घटना न तालुक्यातील अचकदाणी या गावात ही घटना घडली. अचकदाणी येथे नवनाथ शेंडे हे आपल्या पत्नी, मुलगा, मुलगी, आजी यांच्या सोबत राहतात. पती-पत्नी शेतमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. सोहम हा इयत्ता तिसरीमध्ये शिकतो, तर मुलगी पाचवीमध्ये आहे.

नवनाथ हे शेतीच्या कामानिमित्त पिसेवाडी येथे गेले होते, तर पत्नी या मजुरीसाठी गेल्या होत्या. सोहमची बहीणही बाहेर गेली होती. सोहम टीव्ही पहात स्वेटरची लेस लाकडी खुंट्याला बांधून गोल गोल फिरत होता. दरम्यान लेस खुंठीत अडकल्यामुळे अनावधानाने त्याला गळफास लागला व त्याचा जागीच मृत्यू झाला. आजी घरात गेल्या असता त्यांना सोहम खुंटीला लटकलेल्या अवस्थेत दिसला. यावेळी शेजारी असलेल्या महादेव शेंडे यांनी धाव घेतली व नवनाथ शेंडे यांना झालेल्या प्रकाराची माहिती दिली.