सात वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, आरोपीला अटक

Date:

नागपूर : घरासमोर खेळत असलेल्या सात वर्षीय चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या विवाहित युवकाने लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. संतोष मरसकोल्हे (वय ३०, नाका नंबर २) असे आरोपीचे नाव आहे.

पीडित ७ वर्षीय मुलगी मंगळवारी दुपारी चार वाजता घरासमोर खेळत होती. दरम्यान, विकृत प्रवृत्तीचा आरोपी संतोषने चॉकलेटसाठी दहा रुपये देण्याचे आमिष मुस्कानला दाखवले. त्यामुळे ती त्याच्या मागोमाग गेली. त्याने तिला घरात नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. चिमुकली रडत असतानाच तिचा मामा घरी आला. त्यावेळी आरोपी आणि भाचीला अर्धनग्न बघताच त्याने बाजूला पडलेली काठी घेतली आणि आरोपीची चांगली धुलाई केली. आरडाओरडा झाल्यामुळे शेजारी गोळा झाले. त्यांनी जरीपटका पोलिसांना फोन केला. तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली.

अधिक वाचा : विधवेचे अश्लील छायाचित्र व्हायरल, आरोपी फेसबुक फ्रेण्डला अटक

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related