नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील ५८ पैकी ५१ मंत्री कोट्यधीश असून पंजाबच्या हरसिमरत कौर सर्वात श्रीमंत मंत्री आहेत. मोदींच्या नवीन मंत्रिमंडळात केवळ ६ मंत्री कोट्यधीश नसून ओडिशाचे प्रताप सारंगी (संपत्ती १३ लाख ) सर्वात गरीब मंत्री ठरले आहेत. असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्म्स या संस्थेने ही आकडेवारी जाहीर केली आहे.
शिरोमणी अकाली दलच्या हरसिमरत कौर यांच्याकडे तब्बल २१७ कोटींची संपत्ती आहे. त्यांच्यानंतर महाराष्ट्रातून राज्यसभा खासदार असलेले पियुष गोयल हे दुसरे सर्वात श्रीमंत मंत्री असून त्यांच्याकडे एकूण ९५ कोटींची संपत्ती आहे. या दोघांनंतर देशाचे गृहमंत्री अमित शहांचा (संपत्ती: ४० कोटी) नंबर लागतो. या कोट्यधीशांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी ४६व्या क्रमांकांवर आहेत. त्यांच्याकडे २ कोटींची संपत्ती आहे. मंत्रिमंडळातील १० मंत्री मोदींहून गरीब आहेत. मुजफ्फरनगरचे खासदार संजीव कुमार बलियान, अरुणाचल पश्चिमचे खासदार किरण रिजीजू आणि फत्तेहपूरहून खासदार असलेल्या साध्वी निरंजन ज्योती यांच्याकडे १ कोटींची संपत्ती आहे.
देबाश्री चौधरी (६१ लाख) , रामेश्वर तेली(४३ लाख) , व्ही. मुरलीधरन ( २७ लाख), कैलाश चौधरी ( २४ लाख) आणि प्रताप सारंगी (१३ लाख) हे सहाच मंत्री कोट्यधीश नाही.
अधिक वाचा : नागपुरात नेटवर्क मिळेना, फोन काही लागेना