नागपुरात पोळा सणाच्या बंदोबस्तासाठी ३,५०० पोलीस सज्ज

Date:

नागपूर : पोळा आणि दुसऱ्या दिवशीचा तान्हा पोळा अशा दोन दिवसाच्या पोळा सणाच्या बंदोबस्तासाठी शहर पोलीस दल सज्ज झाले आहे. एसआरपीएफ, होमगार्ड, आरसीपी यांच्यासह ३ हजार ५०० पोलीस बंदोबस्तात तैनात करण्यात आले आहेत.

मंगळवारी पोळा आणि बुधवारी तान्हा पोळा असे सलग दोन दिवस हा सण साजरा केला जातो. वर्षभर कष्ट उपसून लाखमोलाचे पीक पदरात घालून देणाºया बैलाच्या उपकाराची जाणीव ठेवून शेतकरीबांधव पोळा साजरा करतात. दुसºया दिवशी बालगोपालांसाठी तान्हा पोळा साजरा केला जातो. हे दोन्ही दिवस मद्यपी आणि जुगारी यांच्यासाठी पर्वणीचे असतात. ठिकठिकाणी जुगार अड्डे भरतात. अवैध दारू विक्रीलाही उधाण आलेले असते. त्यामुळे भांडणे होतात. अनेक गुंड वचपा काढण्याच्या तयारीत असतात. हे सर्व लक्षात घेऊन पोलिसांनी बंदोबस्ताची जोरदार तयारी केली आहे.

शहरातील ३२ ही पोलीस ठाण्यातील पोलीस आपापल्या भागात कडक बंदोबस्त ठेवणार आहेत. दोन्ही दिवस दिवसा आणि रात्री पोलिसांची गस्त राहणार असून झोपडपट्टी सर्चिंग मोहीम राबविली जाणार आहे. ठिकठिकाणी छापेमारीही केली जाणार आहे.

असा राहील बंदोबस्त
पोलीस उपायुक्त : ७
सहायक आयुक्त : ८
पोलीस निरीक्षक : ४०
पीएसआय आणि एपीआय : १५०
पोलीस कर्मचारी : २५००
आरसीपी पथक : ६
एसआरपीएफ : २ कंपनी
होमगार्ड : ५५०

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related