मुंबईतील मॉडेलची हत्या; मित्रानेच केला खून

Date:

मुंबई – सोमवारी मलाड वेस्टमध्ये माइंडस्पेसजवळ झुडपांमध्ये एका ट्रॅव्हल बॅगमध्ये आढळलेल्या 20 वर्षीय तरुणीच्या मृतदेहाचे रहस्य पोलिसांनी अवघ्या 4 तासांतच उलगडले आहे. हा मृतदेह मॉडेल मानसी दीक्षितचा आहे. मानसीच्या हत्येच्या आरोपात पोलिसांनी तिच्या एका मित्राला अटक केली आहे.

बांगूरनगर पोलिसांच्या मते, मिल्लतनगरातील रहिवासी मुजम्मिल सईद (20) नावाच्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. मुजम्मिलने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्यने सांगितले की, घटनेच्या वेळी मानसी त्याच्या फ्लॅटमध्येच होती. दोघांमध्ये काही गोष्टींवरून वाद झाला आणि चुकून त्याने मानसीच्या डोक्यावर स्टूल मारला, यामुळे अनवधानाने मानसीचा मृत्यू झाला.

मानसी दीक्षित राजस्थानच्या कोटातील रहिवासी होती आणि मागच्या 6 महिन्यांपासून अंधेरीत राहत होती. पोलिसांनी सांगितले की, सईद आणि मानसीमध्ये एका कॉमन मित्राच्या माध्यमातून मैत्री झाली होती.

पोलिसांनी सांगितले की, त्यांना सुटकेसची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. बॅगमध्ये एका महिलेचा मृतदेह होता, तिच्या डोक्यावर जखम होती. तिची डेडबॉडी कुशन आणि बेडशीटने कव्हर करण्यात आली होती. पोलिसांनी सांगितले की, त्यांनी याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे. तथापि, सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांना एक कार सापडली, ज्यात आत बसलेल्या एका व्यक्तीने रस्त्याच्या किनारी सूटकेस फेकलेली होती. याच आधारावर पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली आणि त्याच्या इमारतीतून त्याला भादंवि कलम 302 आणि 201 नुसार अटक केली.

अधिक वाचा : व्हॉट्सअॅप ग्रुपवर कुत्र्याशी तुलना केल्यानं; भरचौकात 15 ते 20 जणांनी तलवारीने भोसकून केली एकाची निर्घृण हत्या

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related