नागपूर होणार ऐव्हिएशन मॅन्‍युफॅक्चरिंग हब

Date:

नागपूर: नागपूरच्‍या मिहान विशेष औद्योगिक क्षेत्रामध्‍ये (सेझ) टाल या ऐव्हिऐशन कंपनीने उत्‍पादन चालू केले असून बोईंग या एयरक्राफ्ट निर्मिती करणा-या कंपनीला 25,000 फ्लोर बीमचा पुरवठा करून या कंपनीने एक विक्रम स्‍थापित केला आहे. नागपूरचे एव्हिएशन मॅन्‍युफॅक्चरिंग हबचे स्‍वप्‍न यामुळे आधिक बळकट होईलअसा आशावाद केंद्रीय रस्ते वाहतूकमहामार्ग व जहाजबांधणी आणि केंद्रीय सूक्ष्मलघू व मध्यम उद्योग मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी याप्रसंगी व्‍यक्‍त केला. ‘टाल’ या टाटा उद्योग समूहाच्‍या एयरोस्‍पेस व संरक्षण क्षेत्रातील कंपनीतर्फे त्‍यांच्‍या मिहान येथील प्रकल्‍पातून 25 हजार ऍडव्‍हान्‍स कंपोझिट फ्लोर बीम (ए.सी.एफ.बी.) या एयरक्राफ्ट  निर्मिती साठी लागणा-या पार्टची रवानगी बोंईग एयरक्राफ्ट कंपनीला आज करण्‍यात आलीयावेळी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी  मुख्‍य अतिथी म्‍हणून ते  बोलत होते. टाल कंपनीचे अध्‍यक्ष विजय सिंगपालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेवन राज्‍यमंत्री डॉ. परिणय फुकेमहापौर नंदा जिचकारबोईंग इंडियाचे अध्‍यक्ष सलिल गुप्ते या प्रसंगी प्रामुख्‍याने उपस्थित होते.

टाल  कंपनीसाठी मिहानमध्‍ये जागा संपादन करण्‍यास शासनाने पुढाकार घेतला व टाटा समुहाने त्‍याला सकारात्‍मक प्रतिसाद देत आपला प्रकल्‍प मिहानमध्‍ये चालू केला. या प्रकल्‍पात स्‍थानिक युवक काम करत आहेतही बाब अभिमानास्‍पद असल्‍याचे सांगून गडकरी यांनी टाल कंपनीला मिहानमध्‍ये विस्‍तार करण्‍याचे सुचविले.आय.आय.आय.टीआय.आय.एम,एन.एल.यू. सिंबायोसिस या सारख्‍या शैक्षणिक संस्‍थामूळे नागपूर हे शैक्षणिक हब म्‍हणून उदयास आले असून येथे कुशल व प्रशिक्षित मनुष्‍यबळाची वाणवा नाही. टाल कंपनीच्‍या प्रकल्‍पातही 90 टक्‍के नागपूरच्‍या स्‍थानिकांना भरतीमध्‍ये प्राधान्‍य द्यावेअसे गडकरींनी यावेळी सांगितले.

राज्‍य सरकारने मिहानमधील कंपन्‍याना कमी दरात वीज उपलब्‍ध करून दिली असल्‍याने मिहानमध्‍ये औद्योगिक प्रकल्‍पांना चालना मिळत असल्‍याचे त्‍यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले. या कार्यक्रमादरम्‍यान बोईंग इंडियाचे अध्‍यक्ष सलील गुप्‍ते व टाल कंपनीचे संचालन विभागाचे अध्‍यक्ष यांच्‍यात ए.सी.एफ.बी. पार्टच्‍या रवानगी बाबतच्‍या कागद पत्रांचे हस्‍तांरणही झाले.

बोईंग इंडियाचे अध्‍यक्ष सलील गुप्‍ते यांनी बोईंग व टाल यांची भागीदारी ही भारताच्‍या स्किल इंडिया व मेक इन इंडिया अभियानात महत्‍वाची भूमिका बजावत असल्‍याचे सांगितले. या कार्यक्रमाप्रसंगी बोईंग इंडियाचे कर्मचारीअधिकारी उपस्थित होते.

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related