धक्कादायक! बातमी कोरोनाबाधितांसोबतच नागपुरातील मृत्यूसंख्येत वाढ..

Date:

नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संख्येने चिंतेचे वातावरण पसरले आहे. सलग दुसऱ्या दिवशी दैनंदिन रुग्णांची संख्या १९००वर गेली. शुक्रवारी १९५७ नव्या रुग्णांची भर पडली. धक्कादायक म्हणजे, ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच मृत्यूची संख्या १५ झाली. परिणामी, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
नागपूर धक्कादायक! बातमी रुग्णांची एकूण संख्या १,६५,९८९, तर मृतांची संख्या ४४४० झाली आहे. रुग्णसंख्या अशीच वाढत गेल्यास मेयो, मेडिकल व एम्समधील खाटा अपुऱ्या पडण्याची शक्यता आहे.

 ठळक मुद्दे १९५७ रुग्ण,

नागपूर १५ मृत्यूचाचण्यांची संख्या घटल्याने वाढविली चिंता.

धक्कादायक! बातमी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन गुरुवारी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न होणार, असे आश्वासनही देण्यात आले; परंतु महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून बाधितांच्या संपर्कात आलेल्या संशयितांचे योग्य पद्धतीने ट्रेसिंग होत नसल्याने गुरुवारी पुन्हा एकदा चाचणीत घट आली. नियमानुसार एका रुग्णाच्या संपर्कात आलेल्या किमान चार ते पाचजणांची चाचणी होणे आवश्यक आहे; परंतु तसे होताना दिसून येत नाही. दरम्यानच्या काळातही याकडे दुर्लक्ष झाल्याने रुग्ण वाढल्याचे बोलले जात आहे. झालेल्या ८५८२ चाचण्यांमध्ये ७०९५ आरटीपीसीआर, तर १४८७ रॅपिड अँटिजेनचा समावेश होता. अँटिजेनमधून १२०, तर आरटीपीसीआरमधून ९५७ रुग्ण पॉझिटिव्ह आले.

-शहरात १६३७, ग्रामीणमध्ये ३१७ रुग्ण

नागपूर जिल्ह्यात ग्रामीणच्या तुलनेत शहरात रुग्ण वाढताना दिसून येत आहेत. गुरुवारी शहरात १६०३, तर ग्रामीणमध्ये ३७३ रुग्णांची नोंद झाली होती. शुक्रवारी रुग्णसंख्येत किंचित घट आली असली तरी शहरातील रुग्णसंख्या वाढून १६३७, तर ग्रामीणमध्ये कमी होऊन ३१७ झाली. यामुळे महानगरपालिकेच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आज ९४७ रुग्ण बरे झाले. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या १,४६,४१९ झाली आहे.

-एम्सचा खाटा फुल्ल, मेयो, मेडिकलमध्ये वाढले रुग्ण

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) कोरोनाबाधितांसाठी राखीव असलेल्या ६० खाटा गुरुवारी फुल्ल झाल्या. यामुळे येथील रुग्णांना मेयो, मेडिकलमध्ये पाठविले जात आहे. सध्या मेडिकलमध्ये १९७, तर मेयोमध्ये १८०, मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात ५३, आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये १२, तर पाचपावलीमध्ये ५ रुग्ण उपचार घेत आहेत. उर्वरित ३४७९ रुग्ण विविध खासगी रुग्णालयांत उपचाराखाली आहेत.

-आमदार निवास बंदच

गुरुवारी पालकमंत्री नितीन राऊत यांनी आमदार निवास सुरू करणार असल्याची माहिती दिली होती; परंतु शुक्रवारी बाधित रुग्णांसाठी आमदार निवास बंदच होते. नागपूर विशेष म्हणजे, जिल्ह्यात ९३६४ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. यातील अनेकांकडे सोयी नसतानाही ते गृह विलगीकरणात आहे. परिणामी, कोरोना कुटुंबात पसरून तो इतरांनाही होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Why IT companies in Pune Hinjewadi Continues to Attract IT Companies?

Hinjewadi is the western district of Pune which has...

New IT Companies in Pune Hinjewadi: Pune’s Growing Tech Hub

Hinjewadi is the western district of Pune which has...

Happy Children’s Day 2024: Celebrate the Future, Honor the Present

  Happy Children's Day 2024: Celebrate the Future, Honor the...

India’s largest Multinational IT companies growing in 2025

There are List of Top 10 MNC's in India...