नागपूर : वेगळा विदर्भ आणि हलबा समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी तरुणांनी शहर बसवर दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे.
हलबा समाजाच्या मागण्या आणि विदर्भ राज्य निर्मितीचा ठराव आणावा, या मागणीसाठी विदर्भ राज्य आघाडीचे नागपूर शहर सचिव कमलेश भगतकर यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. मात्र, ५ दिवस लोटूनही शासनाने अद्याप याची दखल घेतली नाही.
कमलेश भगतकर यांच्या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी विदर्भ राज्य आघाडीने सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे. त्याचप्रमाणे सर्वच राजकीय पक्षांनी व संघटनांनी त्यांना समर्थन दिले आहे. मात्र, ५ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे संतापलेल्या ४ तरुणांनी गंगाबाई घाट रोडवर बसवर दगडफेक केली. तसेच परिवहन मंडळाच्या बसवरही दगडफेक केली. या प्रकरणामुळे हलबा आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अधिक वाचा : वैनगंगा नदीत प्रेमीयुगलाची आत्महत्या