दोन युवकांवर जीवघेणा हल्ला, अंबाझरीतील खळबळजनक घटना

Date:

नागपूर : शुल्लक कारणावरून युवकाने दोन युवकांवर धारदार शस्त्राने वार करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना टिळकनगर टी पॉइंटजवळ रविवारी रात्री घडली. पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करून हल्लेखोर युवकाला अटक केली आहे.

राहुल केशव सेवतकर (वय २४,रा. सरस्वतीनगर, काटोल ),असे हल्लेखोर युवकाचे तर अक्षय अशोक सारवे (वय २६) व अंशुल लांडगे (वय २६, दोन्ही रा. जुना फुटाळा), अशी जखमींची नावे आहेत.

रविवारी रात्री अक्षय व अंशुल टिळकनगरमधील चायनिज ठेल्यावर आले. दोघे बोलत होते. याचवेळी राहुल तेथे आला. आपल्याला बघून दोघे बोलत असल्याचा संशय राहुल याला आला. त्याने दोघांसोबत वाद घातला. वाद विकोपाला गेला. राहुल याने धारदार शस्त्राने अक्षय व अंशुलवर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात दोघे खाली पडले. राहुल पसार झाला. माहिती मिळताच अंबाझरी पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी दोघांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करून राहुल याला अटक केली.

अधिक वाचा : सिकंदराबाद एक्सप्रेस में महिला कोच के सीढ़ियों पर मिला शख्स का सिर

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related