कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागपुरातील युवा डॉक्टरने बनविले डॉक्टर्स सेफ्टी बॉक्स!

Date:

नागपूर: देशासह राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर जबाबदारी वाढली आहे. कोरोनाग्रस्त रूग्णाच्या शरीरातून बाहेर पडणार्‍या द्रवाच्या माध्यमातून संपुर्ण जगात कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणावर झाले आहे. अशातच रूग्णावर उपचार करणारे डॉक्टर स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार करीत आहेत.

कोरोनाबाधिताचा संसर्ग होऊन चीन, इटली मध्ये अनेक डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे उपचार करणाऱ्या डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागपुरातील प्रसिध्द युवा डॉक्टर समीर अरबट यांनी एक अनोखे सुरक्षा किट बनविले आहे. याच सुरक्षा किटला डॉ अरबट यांनी “डॉक्टर्स सेफ्टी बॉक्स” असं म्हटलं आहे.

संपुर्ण भारतीय बनावटीच्या या किटमुळे कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग टाळता येऊ शकतो असा दावा डॉ. समीर अरबट यांनी बोलताना केला. आयसोलेशनमधील कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार करताना डॉक्टर, परिचारिका आणि त्यांचे सहाय्यक यांना आवश्यक ती सावधानता आणि सतर्कता बाळगण्याची गरज असते. मात्र तरीही डॉक्टरांना आणि परिचारकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची कित्येक उदाहरणं मागील दोन महिन्यात आढळले आहेत. दवाखान्यातील डॉक्टर्स, नर्सेस आणि पॅरामेडिकल स्टाफ यांना देखील यावेळी सेफ्टी किट म्हणून वाफेवर तापवून निर्जंतूकीकरण करता येण्यासारखे गाऊन, कॅप आणि मास्क देण्यात येतात.

मात्र अशा रूग्णांची ‘ब्रांकोस्कोपी’ करताना रूग्णाच्या घशात नळी टाकण्यात येते. ब्रांकोस्कोपच्या मदतीने श्वसनवाहिन्याची तपासणी केली जाते. या तपासणी दरम्यान रूग्णाला खोकला किंवा शिंका येण्याची दाट शक्यता असते. अशावेळी रूग्णाच्या खोकल्यातून बाहेर पडणारे द्रव तेथे उपस्थित असलेल्या डॉक्टरसह त्यांच्या सहाय्यकांच्या अंगावर पडले तर कोरोनाच्या संसर्गाचा धोका बळावतो. हा धोका टाळण्यासाठी डॉ. समीर अरबट यांनी हे सुरक्षा कीट बनविले आहे. डॉक्टर, परिचारिका यांच्याकरिता हे कीट सुरक्षेच्या दृष्टीने उपयुक्त आहे. कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी हे किट वापरावे असे आवाहन डॉ. समीर अरबट यांनी केले आहे.

Coronavirus: 121 prisoners released from Nagpur jail, 2117 from Maha so far

किट नेमकी कशी आहे?

डॉ. समीर अरबट यांनी बनविलेले हे सेफ्टी किट म्हणजे साधारणतः दोन बाय दीड फुट आकाराचा एक आयताकृती खोका आहे. उपचार करताना हा खोका रूग्णाच्या मानेपासून वरील भागावर म्हणजेच संपुर्ण चेहर्‍यावर ठेवण्यात येतो. अॅक्रीलीक शीटच्या सहाय्याने बनविलेला हा खोका संपूर्णत: पारदर्शक आहे. या खोक्यातून एक हात जाऊ शकेल एवढ्या आकाराचे तीन छिद्र तयार करण्यात आले आहे. जेणेकरून डॉक्टर, परिचारिका यांना त्या छिद्रातून हात घालून रूग्णाच्या श्वसनवाहिन्याची तपासणी करताना लागणार्‍या नलिका रूग्णाच्या मुखावाटे आत सोडता येतील.

दहा तासांचे ऑपरेशन करोना

मुखावाटे नलिका आत सोडताना रूग्णाला खोकला आला तरी खोकल्यातून बाहेर इतरत्र उडणारे द्रवपदार्थ या खोक्याच्या बाहेर उडत नाही. आणि कोरोना चे संक्रमण रोखण्यासाठी या खोक्याच्या सहाय्याने डॉक्टरांना स्वतः चा बचाव करता येऊ शकतो. हे कीट बनवायला साधारणपणे दोन हजार रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. वापरलेल्या किटचे निर्जंतूकीकरण करून तीच किट पुन्हा दुसर्‍या रूग्णाकरीता उपयोगात आणता येईल असे डॉक्टर अरबट यांनी सांगितले. एका किटच्या मदतीने शंभर रूग्णांचा उपचार करता येतो.

कोण आहेत डॉ. समीर अरबट

डॉ. समीर अरबट हे नागपुरच्या क्रिम्स हॉस्पीटल मध्ये पल्मनॉलॉजीस्ट आहेत. त्यानी वर्धा येथील सावंगी वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसची पदवी घेऊन तेथूनच पल्मनॉलॉज मध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण केली आहे. या पुर्वी त्यांनी पल्मनॉलॉजीवर दोन शोधनिबंध सादर केले आहेत. अमेरिकन कॉलेज ऑफ चेस्ट फिजीशियनची त्यांनी फेलोशीप पूर्ण केली आहे.

इटली येथूनही त्यांनी इंटरवेन्शनल पल्मनॉलॉजी या विषयात फेलोशीप मिळविली आहे. न्युयार्क येथील रोचेस्टर विद्यापीठात त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. नागपुरात येण्यापूर्वी डॉ. अरबट यांनी मुंबईच्या केईएम रूग्णालय, टाटा कॅन्सर हॉस्पीटल आणि नवी दिल्ली येथील राजीव गांधी कॅन्सर इन्स्ट्यीट्यूट येथे सेवा दिली आहे.

Also Read- ‘रुग्णालयाची अवस्था उकिरड्या सारखी झाली आहे, काम जमत नसेल तर घरी जा’

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Top 10 Email Migration Software for Gmail in 2024

Email migration can be a daunting task, especially when...

Top Best Bulk SMS Service Providers in India

Below is the list of companies currently providing top...

Top Digital Marketing Innovators to Watch in 2025

As an online business in the digital world, where...

ICSI Workshop in Nagpur : “Decoding Companies Act” for Compliance and Governance

Nagpur : Nagpur Chapter of ICSI organized a Workshop...