6,000mAh बॅटरी असलेला ‘या’ Xiaomi फोनची किंमत झाली कमी; जाणून घ्या नवीन किंमत

काही दिवसांपूर्वी बातमी आली होती कि Xiaomi आपली बजेट सीरिज Redmi 10 Series भारतात घेऊन येणार आहे. कंपनीने ही सीरिज ट्विटरवर टीज केली होती. आज अशी एक बातमी आली आहे त्यामुळे रेडमी 10 सीरीजचा लाँच निश्चित झाला आहे. शाओमीने भारतातील Redmi 9 Power ची किंमत कमी केली आहे. रेडमी 9 सीरीजच्या स्मार्टफोनच्या प्राइस कटवरून Xiaomi Redmi 10 सीरीज भारतात लवकरच दाखल होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

Xiaomi Redmi 9 Power ची नवीन किंमत

रेडमी 9 पावर भारतात तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आला होता. यातील 4GB रॅम + 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत कंपनीने 500 रुपयांनी कमी केली आहे. त्यामुळे 10,999 रुपयांमध्ये मिळणारा हा स्मार्टफोन आता 10,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या फोनच्या 4GB रॅम + 128GB आणि 6GB रॅम + 128GB व्हेरिएंट्सची किंमत क्रमशः 11,999 रुपये आणि 12,999 रुपये आहे.

Xiaomi Redmi 9 Power चे स्पेसिफिकेशन्स

रेडमी 9 पावरमध्ये 6.53 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये क्वाॅलकाॅमचा स्नॅपड्रॅगन 662 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 610 जीपीयूला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 10 आधारित मीयुआय 12 वर चालतो.

रेडमी 9 पावरमधील क्वाॅड रियर कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी रेडमी 9 पावरमध्ये 18वाॅट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असेलली 6,000एमएएचची मोठी बॅटरीला देण्यात आली आहे.