मिझल्स रुबेला लसीकरण मोहिमेकरिता कार्यशाळेचे आयोजन

नागपूर

नागपूर: मिझल्स रुबेला लसीकरण मोहिमेकरिता दि. ३.११.२०१८ रोजी AEFI कमिटी बैठक नागपुर महानगरपालिका स्थरावर आरोग्य विभाग महानगरपालिका कार्यालय येथे मा. आरोग्य अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली.  त्यात खालील मुद्यावर चर्चा करण्यात आली.

  • एम. आर. लसीकरणाच्या दिवशी एखाद्या विद्यार्थाला जर काही लसीकरण नंतर ची गुंतागुंत झाली तर त्या भागातील बालरोग तज्ञाकडे त्याला उपचार देण्यात येतील. अश्या बालरोग तज्ञाच्या याद्या शहरातील १० झोन कडून तयार करण्यात येईल.
  • आय.ए.पी.  सर्व बालरोग तज्ञाच्या याद्या आरोग्य विभागाला देतील असे बैठकीत ठरले.

मिझल्स रुबेला लसीकरण कार्यक्रमाला मिळाली सर्व खासगी बालरोग तज्ञांची साथ

मिझल्स रुबेला लसीकरण मोहीम नागपुर महानगरपालिका क्षेत्रात राबवायची आहे. त्यात ९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील सर्व मुलांना मिझल्स रुबेला ची लस लागणार आहे. या मोहिमेकरिता आय. ए. पी. चे सर्व सदस्यांची कार्यशाळा टाऊन हॉल महाल येथे घेण्यात आली व सर्वांनी मिझल्स रुबेला लसीकरण मोहिमेकरिता सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

या कार्यशाळेला आय. ए. पी. चे सदस्य डॉ. साजिद खान एस. एम. ओ., डॉ. असिम इनामदार डी. आर. सी. एच. ओ., डॉ. नरेंद्र बहिरवार, डॉ. सुनील घुरडे लसीकरण अधिकारी, सौ. दीपाली नागरे उपस्थित होते.

अधिक वाचा : ‘हेल्थ रन’ला नागपुरकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद