महिला हॉकी वर्ल्ड कप शनिवारपासून

महिला हॉकी वर्ल्ड कप शनिवारपासून

लंडन : महिला हॉकी वर्ल्ड कप ला येत्या शनिवारपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेत नेहमीप्रमाणे नेदरलँड्स, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया या संघांनाच फेव्हरिट मानले जात आहे. महिला हॉकी क्रमवारीत नेदरलँड्सचा संघ अव्वल असून, इंग्लंडचा संघ दुसऱ्या, तर अर्जेंटिनाचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ कुठपर्यंत मजल मारतो, याबाबत उत्सुकता आहे.

महिला हॉकी वर्ल्ड कप या स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येकी चार संघांचे चार गट तयार करण्यात आले आहेत. यात गटातील अव्वल संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत दाखल होईल. गटात चौथ्या स्थानी राहणाऱ्या संघाचे आव्हान संपुष्टात येईल. त्याचबरोबर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी असलेल्या संघांना प्ले-ऑफमध्ये खेळण्याची संधी मिळेल. प्ले-ऑफमधील विजयी संघ उपांत्यपूर्व फेरीत खेळेल.

भारतीय महिला संघ : गोलकीपर – सविता, रजनी एतमार्पू. डिफेंडर – सुनीता लाक्रा, दीप ग्रास एक्का, दीपिका, गुरजित कौर, रीना खोखर. मिडफिल्डर – नमिता टोप्पो, लिलिमा मिन्झ, मोनिका, नेहा गोयल, नवज्योत कौर, निक्की प्रधान. फॉरवर्ड – राणी रामपाल (कॅप्टन), वंदना कटारिया, नवनीत कौर, लालरेमसिमी, उदिती.

स्पर्धा कालावधी : २१ जुलै ते ५ ऑगस्ट

स्थळ : ली व्हॅली हॉकी अँड टेनिस सेंटर, लंडन

गट : अ गट : नेदरलँड्स, दक्षिण कोरिया, इटली, चीन

ब गट : भारत, इंग्लंड, अमेरिका, आयर्लंड

क गट : अर्जेंटिना, जर्मनी, स्पेन, दक्षिण आफ्रिका

ड गट : ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जपान, बेल्जियम

मागील पाच विजेते :

वर्ष विजेता उपविजेता स्थळ
२०१४ नेदरलँड्स ऑस्ट्रेलिया नेदरलँड्स
२०१० अर्जेंटिना नेदरलँड्स अर्जेंटिना
२००६ नेदरलँड्स ऑस्ट्रेलिया स्पेन
२००२ अर्जेंटिना नेदरलँड्स ऑस्ट्रेलिया
१९९८ ऑस्ट्रेलिया नेदरलँड्स नेदरलँड्स

भारताचे सामने

तारीख विरुद्ध वेळ
२१ जुलै इंग्लंड सां. ६.३० पासून
२६ जुलै आयर्लंड सां. ६.३० पासून
२९ जुलै अमेरिका रात्री १०.३० पासून

अधिक वाचा : आयसीसी वनडे रँकिंग: कोहली चे अव्वल स्थान कायम