नागपूर : प्रेमात अडसर ठरत असलेल्या पतीचा प्रियकराच्या मदतीने पत्नीने दगडाने ठेचून खून केला. खून केल्यानंतर अपघात झाल्याचा देखावा निर्माण करीत पोलिसांची दिशाभूल केल्याचा आरोप मृताच्या नातेवाइकांनी केला आहे. या प्रकरणी तूर्तास पाचपावली पोलिसांनी केवळ आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
पंकज चंद्रकांत अंभोरे (वय 34, रा. व्यंकटेश्वरनगर) असे मृत पावलेल्या युवकाचे नाव आहे. पंकजचे मामा अविनाश जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज अंभोरे हे एका खासगी कंपनीत क्वॉलिटी सुपरवायझर होते. त्यांची काही वर्षांपूर्वी मनीषा (बदललेले नाव) हिच्यासोबत ओळख झाली होती. मनीषाच्या पहिल्या पतीने आत्महत्या केली होती. तर, गुजरातमधील एका व्यापाऱ्याशी दुसरे लग्न केले होते. त्यानंतर पंकज आणि मनीषाचे प्रेमसंबंध निर्माण झाले. मनीषाला तिसरे लग्न धूमधडाक्यात करायचे होते. परंतु, पंकजच्या नातेवाइकांनी लग्नास नकार दिला. त्यामुळे त्यांनी गुपचूप लग्न करून एका भव्य इमारतीमध्ये लाखोंचा फ्लॅट विकत घेऊन संसार थाटला. यादरम्यान मनीषाची मैत्री अरुण नावाच्या विवाहित युवकासोबत झाली. दारू पिण्याच्या सवयीची असलेल्या मनीषाची अरुणसोबतची मैत्री दिवसेंदिवस वाढली. मनीषा आणि अरुण यांच्या मैत्रीत पंकज अडसर ठरत होता. त्यामुळे दोघांनीही पंकजचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. कट रचून दगडाने ठेचून खून केला.
अधिक वाचा : ट्रॅव्हल्समध्ये सामूहिक अत्याचाराचा प्रयत्न



