नागपूर : अमरावती तसेच दक्षिण एक्स्प्रेसमधून आरपीएफने आज मद्यसाठा जप्त केला.
नागपूर रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर उभ्या असलेल्या अमरावती एक्स्प्रेसमधून दारूच्या १०० बाटल्या जप्त करण्यात आल्या. १२१६० अमरावती एक्स्प्रेस ही गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर उभी होती. त्यावेळी या गाडीच्या जनरल कोचमध्ये आरपीएफच्या पथकाला चार बॅग बेवारस आढळल्या. त्या उघडून पाहिल्या असता त्यात मद्याच्या १६ बाटल्या आढळल्या.
दुसरी कारवाई सायंकाळी दक्षिण एक्स्प्रेसमध्ये झाली. सायंकाळी प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर १२७२२ दक्षिण एक्सप्रेस उभी होती. त्यावेळी या गाडीच्या एस ३ कोचमध्ये एक बॅग बेवारस आढळली. या बॅगमध्ये मोठा मद्यसाठा होता. हा मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुपूर्द करण्यात आला. ही कारवाई वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडेय यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक जी.एस. एडले, सीताराम जाट, हेड कॉन्स्टेबल अर्जुन सामंतराय, संतोष पटेल, लाडसकर, कॉन्स्टेबल दीपक पवार, बी.बी. यादव यांनी केली.
अधिक वाचा : शताब्दी नगर पुलिस स्टेशन में आग