नागपुर :- राज्यातील शेतकऱ्यांनी सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची माफी झाल्यानंतरही अनेक सावकारांनी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या जमिनी परत केलेल्या नाहीत. अशा सावकारांवर कारवाई करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात केलेली आहे. कर्जमाफी झाल्यानंतरही अनेक सावकारांनी शेतकऱ्यांच्या जमिनी आपल्याच ताब्यात ठेवल्या असल्याची बाब विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे आणि विद्या चव्हाण यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहासमोर आणली. यावेळी सुरुवातीला राज्यमंत्री प्रवीण पेाटे यांनी उत्तर दिले. मात्र, विषय गंभीर असल्याचे बघून मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करत म्हणाले, की या संदर्भात तत्काळ समिती नेमून सरकारने सावकरांच्या खात्यात कर्जाची रक्कम जमा करुन देखील जर शेतकऱ्यांना जमिनी परत दिल्या नसतील तर त्यांच्यावर कारवाई करुन त्या जमिनी तात्काळ परत शेतकऱ्यांना दिल्या जातील, असे ठोस आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषदेत दिले.
राज्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी गहाण ठेवणाऱ्या सावकारांवर कारवाई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Date: